Posts

आई....😍😘

आई तू मायेचा सागर आहेस  आई तू प्रेमाची घागर आहेस कस सांगू आई तुला तू तर साक्षात भगवंत आहेस ग... बाळाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी  आई आहेस तू स्वताच्या पोठातली भूक लपवून मुलाच पोठ भरणारी पहिली  आई अन्नदाता आहेस तू... मुलाने चुका केल्यास हात न उचलता खुप काही समजवून सांगनारी आणि चुका सुधरवण्याची संधी देणारी गुरुदेव आहेस तू... आई सर्वांचे सुख दुखांत पाठीशी उभी राहतेस ग तू  दुर्गा मातेला हात तर अनेक आहेत पण  आईला हात कमी असले तरी दुर्गा माँ आहे सर्वांची... आई तू घरचे कामे नाही केलीस ना तरी चालेल फक्त आमच्या समोर राहीलीस तरी या जगातले  33 कोटी देवतांच दर्शन आम्हाला तू आहेस  म्हणून होत ग आई....

ते बालपण...😊

Image
आज पुन्हा बालपन आठवले त्या  एका जुन्या वही मुळे  थोडे हसू देखील आले  ती जुनी वही उघडल्यावर इकडून तिकडे वाकडे तिकडे नाचनारे माझे अक्षर पाहुन हसू देखील खुप आले... एका वही मुळे पुन्हा  मला बालपनात नेले तेव्हा वाटलेल्या  चॉकलेटचे कागद अजूनही तसेच राहिलेत एकदा तीने दिलेला तो चॉकलेट चा कागद सापडला अन पुन्हा बालपनात हरवून नेल मला... बालपन खरच खुप छान होत पाऊस पडू लागला की त्या एका  डपक्यात आम्ही मित्र एकमेकांचे  हात धरून त्यातुन बाहेर पडून घरी जायचो... 26 जानेवारी आली की खुपच  गोळ्या जमा करायचो  भारत माते की जय म्हणुन घोषणा देखील खुपच जोरात द्यायचो... वहिचे पाने खुप आहेत हो  आठवणी सांगणारे पन लिहायला वेळ अपुरा पडेल हो एक आठवण नक्कीच सांगेन, ज्यांच्या सोबत मि होतो त्यांना  अजूनही विसरलेलो नाही  तुला बगतो म्हणनारा मित्र अजूनही मी रुदयात जपून ठेवलेला आहे ...