ते बालपण...😊
त्या एका जुन्या वही मुळे
थोडे हसू देखील आले
ती जुनी वही उघडल्यावर इकडून तिकडे
वाकडे तिकडे नाचनारे माझे
अक्षर पाहुन हसू देखील खुप आले...
एका वही मुळे पुन्हा
मला बालपनात नेले तेव्हा वाटलेल्या
चॉकलेटचे कागद अजूनही
तसेच राहिलेत
एकदा तीने दिलेला तो
चॉकलेट चा कागद सापडला अन
पुन्हा बालपनात हरवून नेल मला...
बालपन खरच खुप छान होत
पाऊस पडू लागला की त्या एका
डपक्यात आम्ही मित्र एकमेकांचे
हात धरून त्यातुन बाहेर पडून घरी जायचो...
26 जानेवारी आली की खुपच
गोळ्या जमा करायचो
भारत माते की जय म्हणुन घोषणा देखील
खुपच जोरात द्यायचो...
वहिचे पाने खुप आहेत हो
आठवणी सांगणारे पन लिहायला
वेळ अपुरा पडेल हो
एक आठवण नक्कीच सांगेन,
ज्यांच्या सोबत मि होतो त्यांना
अजूनही विसरलेलो नाही
तुला बगतो म्हणनारा मित्र अजूनही मी
रुदयात जपून ठेवलेला आहे ...